फुलंब्री तालुक्यात जि. प. निवडणुकीत चारपैकी तीन गटात फुलले कमळ

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) : जि. प. निवडणुकीत चारपैकी तीन गटांत कमळ फुलले आहे. फुलंबी जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपाने ४ पैकी ३ गटांत विजयी मिळवला. तर काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी दिली नसल्याने तुतारी हाती घेतलेल्या पार्थीकर यांनी पाल गटातुन बाजी मारली. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. आमदार अनुराधा चव्हाण गांचे पुतणे निखिल चव्हाण हे गणोरी गटातुन विजयी झाले.

जिल्हा परिषदेच्या गणोरी गटाकडे तालुक्याचे लक्ष्य लागले होते. या गटात भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल कल्याण चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवार दूध संघाचे संचालक संदीप जोरसे यांना १६०० मताने पराभव केला. तसेच पाल गहातुन काँग्रेसने गितांजली वरुण पार्थीकर यांना उमेदणारी दिली नसल्याने त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची तुतारी हाती घेत भाजप उमेदवार लंकाबाई आप्पाराव काकडे यांचा दारुण पराभव केला.

 काँग्रेसच्या बडोदबाजार गटातून भाजपाचे गोपाल वाघ यांनी विजयी मिळविला. त्यांनी शिवमंना शिये गटाचे मंगेश साबळे यांचा पराभव केला. बाबरा गटातून भाजपचे जितेंद्र जैस्वाल यांनी आपला गड तिसऱ्यांदा राखला. त्यांनी शिवसेना उबाठाचे मनोहर पाटील यांना पराभूत केले.